Thane Monsoon 2022 : ठाण्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तर या पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून अद्याप दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.

हायलाइट्स:
- ठाण्यात पुराच्या पाण्यात चौघे वाहून गेले
- २ जणांचे मृतदेह मिळाले तर २ जण बेपत्ता
- बेपत्तांचा शोध घेण्याचं काम सुरू
बेपत्ता असलेल्या दोन जणांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. भगवान भगत (रा.कोठारे), बाभळी वाघ (रा. शिलोत्तर), तुकाराम मुकणे (रा. टेंभरे) आणि विमल सराई (रा. पिवळी खोर) असे ओढ्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. या पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पूराच्या पाण्यात चार जण वाहून गेले आहेत. यापैकी दोन जण बेपत्ता आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. नदी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्यांची शोध मोहीम सुरू आहे.
बेपत्या झालेल्या चार जणांपैकी एक महिला बाजारात सामान खरेदी करून घरी जाताना रस्त्यावर पाणी वाहत होते. त्यामुळे ती पाण्यातून वाट काढत घरी जाताना ती वाहून गेली. तर तीन शेतकरी शेतातून घरी येताना रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. चारपैकी दोघांचे मृतदेह नदी पात्रातून काढण्याच बचावपथकाला यश आलं आहे. मात्र, दोघे जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : thane shahapur monsoon news four people were swept away in the flood waters two died and two went missing
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network