अमरावती: अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इरफान खान हा राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

अमरावती हत्या प्रकरणाची लिंक दिल्लीत असल्याचा दावा ठाकूर यांनी केला. देशात होणाऱ्या हत्यांमध्ये काही समान धागे दिसत आहेत. अमरावती जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदयपूर हत्या प्रकरणातील मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत आहे, तर अमरावती येथील इरफान खान हा राणा यांचा कार्यकर्ता असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, असं ठाकूर म्हणाल्या.
माझ्याशी संबंध ठेवतोय अन्…; सोलापुरातील भाजपच्या बड्या नेत्याचा धक्कादायक बेडरूम व्हिडीओ
उदयपूर असो वा अमरावती, या सर्व घटनांची लिंक एका विचारधारेची जोडलेली दिसत आहे. एकूणच या सर्व घटना सुनियोजित असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातलं वातावरण सलोख्याचं राहिलं आहे. मात्र हे वातावरण दूषित करण्याचं काम येथील आमदार-खासदार दाम्पत्य करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
गोव्यात महाराष्ट्राची पुनरावृत्ती? विमान सज्ज, आमदार ‘उडायच्या’ तयारीत; पण अचानक…
इरफान खाननं रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं, अशी माहिती पुढे आली आहे. इरफान खानच्या फेसबुक फिडवर नजर टाकल्यास त्यानं राणा दाम्पत्यासाठी अनेक पोस्ट केल्याचं दिसतं. मात्र आपला इरफान खानशी कोणताही संबंध नसल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तो कोणत्याी पक्षाशी संबंधित असो, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी राणांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here