मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत बरीच वळणं येत आहेत. यश अजून तुरुंगातच आहे. सगळे जण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण चिंताही आहे. नितीन आणि शेखरला कामतांच्या रिसाॅर्टमध्ये एक चिप मिळते. ती बघताना, एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे नील हा अजून जिवंत आहे. पण तो कुठे लपलाय हे कळत नाही.

मालिकेत एक अनपेक्षित वळण येतं. देशमुखांच्या बंगल्यात दारासमोर एक महिला येते. समोर अरुंधतीच जाते. हे देशमुखांचं घर ना म्हणून विचारते. तिथे उभा असलेला अनिरुद्ध तुम्ही पत्रकार असलात तर निघून जा म्हणून ओरडतो. तेव्हा ती महिला शांतपणे म्हणजे, मी सुदर्शन कामतांची बायको. नीस कामतची आई.

माझी तुझी रेशीमगाठ : मिथिला-विश्वजीत देतायत गुड न्यूज, सिम्मीची वाढली चिंता

अख्ख्या देशमुख कुटुंबाला धक्का बसतो. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नील कामतच्या आईमुळे कुठल्या गोष्टी समोर येणार, नीलबद्दल काही कळणार का, हे सगळं आता येत्या भागांत पाहायला मिळणार आहे.


यश आणि नीलची मारामारी झाली तेव्हा कॅमेरा सुरू होता. त्यामुळे खरं काय घडलंय, ते कॅमेऱ्यात कैद झालंय की नाही हे येत्या काही दिवसांत समोर येईल. इकडे सुलेखाताई अविनाशशी केससंबंधी चर्चा करताना दाखवल्या आहेत. त्या म्हणतात, कदाचित नीलला परदेशात पाठवलं असेल. नाही तर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

आई कुठे काय करते

दरम्यान, काॅलनीतले शेजारी देशमुखांच्या बंगल्यात येतात. तिथे येऊन ते सगळ्यांना दिलासा देतात. एक गृहस्थ म्हणतात, ‘यश चांगला मुलगा आहे. जाता-येताना भेटतो. हातातलं सामान घेतो. कधी मधे भेटला तर स्कुटरवरून घरी सोडतो.’ सगळे जण यशबद्दल चांगलंच बोलतात. एक महिला म्हणते, ‘अरुंधती तुझे संस्कार आम्ही पाहिलेत. तू डोळ्यात तेल घालून तीनही मुलांना वाढवलं आहेस.’

Video : तू धगधगती आग… म्हणत केलाय अनन्याच्या जिद्दीला सलाम, हृता दुर्गुळेचं हे

संजय जाधवच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’बद्दल तुम्हाला कळलं का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here