Maharashtra Political crisis : अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचं पोलीस संरक्षण ठाणे पोलिसांनी काढून घेण्यात आलं आहे. अरविंद वाळेकर हे १९९६ सालापासून शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

हायलाइट्स:
- अंबरनाथच्या शिवसेना शहरप्रमुखांचं पोलीस संरक्षण काढलं
- अरविंद वाळेकर यांचं पोलीस संरक्षण ठाणे पोलिसांनी काढलं
- शिंदे गटाच्या आमदारांशी असलेला वाद भोवल्याची चर्चा
अरविंद वाळेकर हे १९९६ सालापासून शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राज्यात शिवसेनेत २ गट पडल्यानंतर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे २० नगरसेवकांना घेऊन शिंदे गटात सामील झाले. तर अरविंद वाळेकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. यानंतर ६ जुलै रोजी अंबरनाथ नगरपालिकेत आमदार बालाजी किणीकर आलेले असताना शिवसैनिक महिलांचे त्यांच्याशी शाब्दिक वाद झाले होते. यावेळी अरविंद वाळेकर यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर या महिलांचं नेतृत्त्व करत होत्या.
यानंतर सोमवारपासून अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांचं पोलीस संरक्षण ठाणे पोलिसांनी काढून घेतलं आहे. अरविंद वाळेकर यांच्यावर २०११ साली अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेत घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत वाळेकर हे दैव बलवत्तर म्हणून बचावले होते. तेव्हापासून वाळेकर यांना ठाणे पोलिसांनी पोलीस संरक्षण दिलं होतं. मात्र, सोमवारपासून वाळेकर आणि त्यांचे बंधू राजू वाळेकर यांचं पोलीस संरक्षण अचानकपणे काढून घेण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांना विरोध केल्यानंतर वाळेकर यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आल्याची चर्चा यानंतर अंबरनाथ शहरात आहे. याबाबत वाळेकर यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network