मुंबई :दीपा परब ही दामिनी या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचली. ऑल द बेस्ट नाटकाच्या पहिल्या ग्रुपमध्ये दीपा होती. तिच्याबरोबर अंकुश चौधरी, विकास कदम आणि भरत जाधव होते. ते पहिलंच नाटक सुपर डुपर हिट झालं होतं. त्यानंतर दीपा आणि अंकुशचं लग्न झालं. थोडा काळ दीपा सगळ्या प्रकाशझोतापासून दूर होती.

आई कुठे काय करते: अरुंधतीसमोर चक्क नील कामतची आई उभी, सत्य येणार का बाहेर?

दीपा अधेमधे जाहिरातीत दिसायची आणि दिसतेही. नंतर तिनं आपला मोर्चा हिंदी मालिकांकडे वळवला. रेत, छोटी माँ, थोडी खुशी थोडा गम अशा मालिकांमध्ये तिनं महत्त्वाच्या भूमिका केल्या. तरीही मराठी प्रेक्षक तिला मिस करत होता. त्यांना ती मराठी मालिकांमध्ये हवी होती. आणि शेवटी प्रतीक्षा संपली. ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका तू चाल पुढं मध्ये दीपा ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमोमधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच तुझ्यात जीव रंगला मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतेय. मालिका १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता असणार आहे.

दीपा परब

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, ‘बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर आहे. ही कथा गृहिणी असलेल्या अश्विनीभोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधीनंतर मराठी मालिका करतेय. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते.’

माझी तुझी रेशीमगाठ : मिथिला-विश्वजीत देतायत गुड न्यूज, सिम्मीची वाढली चिंता

दीपा पुढे म्हणते, ‘या मालिकेतील अश्विनी ही प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे.’

मुलाला वाढवताना केलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल निवेदिता सराफ यांना वाटते खंत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here