अकोला : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील दाळंबी जवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला उडवले. यात एक महिला ठार झाली असून दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. या अपघातात एक लहान मुलीचाही समावेश आहे.

खर्डा गावातील रहिवासी नाजूकराव गवई यांची पत्नी वर्षा व मुलगी काजल नातेवाईकांच्या घरी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या एमएच ३० बीएफ ३६९३ या गाडीने जात होते. या दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील दाळंबीजवळ त्यांच्या मोटर सायकलला ट्रकने उडवले. या अपघातात वर्षा नाजुक गवई (वय ३५ वर्ष) यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी काजल गंभीर जखमी झाली. गंभीर असल्याने तिला अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अगोदर स्थगिती का दिली? ट्विट करण्यापेक्षा पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा : राजू शेट्टी
मोटरसायकल चालक नाजूक गवई यांना सुध्दा मार लागला आहे. यावेळी कुरणखेड येथील सदैव मदतीसाठी धावून येणारे वंदेमातरम आपात्कालीन पथकाचे मनिष मेश्राम, नितेश मोहोड, उमेश आटोटे, गौतम मोहोडसह उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केले.

पाठलाग करून ट्रक चालकाला पकडलं

एमएच ११ टीव्ही ९९९२ क्रमाकांचा ट्रक चालक हा अपघातानंतर फरार झाला होता. मात्र, काही अंतरावर सोनोरी गावाजवळ नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करत त्याला पकडलं. अपघातामुळे बराच वेळ राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघात स्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

चिखली गावावर पुन्हा काळे ढग, ग्रामस्थ धास्तावले, स्थलांतराची तयारी सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here