हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही कायम असल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके रस्त्यावरील मधुमती नदीला आलेल्या पुरामुळे रात्रीपासून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तसंच काही नागरिक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून धोकादायक प्रवास करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तसंच ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नसून काळोख निर्माण झाला आहे.