Presidential Election 2022 | भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य विधानभवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूममध्ये पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.

 

President Election
राष्ट्रपतीपद निवडणूक

हायलाइट्स:

  • निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे
  • हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर बुधवारी सकाळी प्राप्त झाले
  • साहित्य सचिवालयाच्या स्ट्राँग रूममध्ये पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे
मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर बुधवारी सकाळी प्राप्त झाले. या सर्व साहित्याची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे. (Presidential Election 2022)
एकनाथ शिंदेंचे ‘ते’ शब्द आठवताच दीपक केसरकरांच्या डोळ्यात आलं पाणी
येत्या १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाकरिता नवी दिल्ली, पुदूच्चेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य विधानभवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूममध्ये पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.
मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय, थोरात कोड्यात

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : presidential election 2022 ballot box and other equipment bring from delhi to mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here