Panchanga River in Kolhapur | पंचगंगा नदीच्या पाण्याचा स्तर वाढत असल्याने पात्राबाहेर पंचगगेच्या (Panchganga River) परिसरातील भागात नदीचे पाणी पसरले आहे. त्यामुळे पंचगंगेच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही तासांत पाऊस (Rain) थोड्या-थोड्या अंतराने पडत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

 

हायलाइट्स:

  • पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट
  • धोका पातळी ४३ फूट इतकी आहे
कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीतील पाण्याचा स्तर आता इशारा पातळीच्या जवळ पोहोचला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. सध्या पंचगंगा नदीतील पाण्याने ३५ फूट २ इंच इतका स्तर गाठला आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांमध्ये पंचगंगा इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. (Heavy Rain in Kolhapur)

पंचगंगा नदीच्या पाण्याचा स्तर वाढत असल्याने पात्राबाहेर पंचगगेच्या परिसरातील भागात नदीचे पाणी पसरले आहे. त्यामुळे पंचगंगेच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही तासांत पाऊस थोड्या-थोड्या अंतराने पडत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Mumbai Rain: मुंबईत सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने
पुढील दोन ते तीन तासांमध्ये मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास या भागांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Monsoon Alert : राज्यात दोन दिवस अस्मानी संकट, मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
चंद्रपुरात इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

चंद्रपूरमध्ये इरई धरणाचे पाच दरवाजे आणि लोअर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर गोसीखुर्दचे २८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा,वैनगंगा,इरई नदीला पूर आला आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद झालेला आहे. पुलावरून दोन फूट वर पाणी वाहत आहे. सोईट गावातील वर्धा नदीपात्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळ पासून वाहतूक बंद झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळे मार्ग बंद आहे. बल्लारपूर तालुक्यातील माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळ पासून बंद झाला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra rain heavy rain kolhapur panchganga river in kolhapur flood situation
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here