Raj Thackeray and Devendra Fadnavis | राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती.

 

Raj Thackeray Devendra Fadnavis (1)
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे जाहीर आभार मानले होते
  • आज देवेंद्र फडणवीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय सत्तानाट्यात आता नवा अंक पाहायला मिळणार आहे. कारण, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. (Devendra Fadnavis will meet MNS chief Raj Thakceray)

गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिष, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे जाहीर आभार मानले होते. तसेच आपण लवकर त्यांची भेट घेऊन आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. आता या भेटीत काही महत्त्वाची चर्चा होऊन राजकीय नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेना फुटली आणि मनसेने डाव साधला, आदित्य ठाकरेंना जमलं नाही ते ‘राजपुत्रा’ने केलं

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. एकनाथ शिंदे यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. तर मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.
‘मातोश्री’चे निष्ठावंत ‘शिवतीर्था’वर, शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला
मनसेच्या आमदाराला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे गट आणि मनसे असे समीकरण जुळवण्याचे मनसुबे आखले जात आहेत. मात्र, ‘रिपाई’चे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी मनसेच्या आमदाराला मंत्रिपद देण्यास विरोध दर्शवला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp dcm devendra fadnavis will meet mns chief raj thackeray at shivtirth mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here