अमरावती : पाच डोंगरी येथील विहिरीतल्या दूषित पाणी पिल्याने सुमारे २५० पेक्षा अधिक नागरिकांना आजाराची लागण झाली आहे. हेच पाहण्यासाठी केलेल्या नवनीत राणा यांना येथील नागरिकांनी पिण्यासाठी पाणी दिले. मात्र, त्यांनी पाणी नाकारल्याने नागरिकांचा रोष अनावर झाला.
यावेळी नवनीत राणा बोलल्या की तुम्ही हे पाणी पिऊन दाखवा त्यावर उत्तर देत राठोड यांनी सांगितले आजपर्यंत तर हेच पाणी प्यायलं. मात्र, आता तुमच्यासमोरही पिऊन दाखवतो असं बोलून राठोड यांनी त्या ग्लासमधील पाणी सर्वांसमोर प्यायलं.