three siblings dies after drowning in pune: चाकण एमआयडीसी येथील आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर असणाऱ्या एका कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला होता. मूळचे बिहारचे असणाऱ्या किशोर दास यांचे कुटुंब चाकण येथे पोट भरण्यासाठी आले आहे. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

घराजवळ असणाऱ्या डबक्यात कडेला तीन भावंडं खेळत होती. मात्र खेळता खेळता ते पुढे गेले आणि एकदम खाली गेले. पाण्याचा आणि खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली. क्षणात होत्याच नव्हतं झालं. रोहित दास (वय ८), राकेश दास (वय ६), श्वेता दास (वय ४) अशी मयत झालेल्या मुलांची नावं आहेत.
बिहार येथून पोट भरण्यासाठी आलेल्या किशोर दास यांचे कुटुंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. मात्र अचानक ही घटना घडल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. मनात विचारही न केला नव्हता की एवढी मोठी घटना घडेल. माझ्या मुलांच्या बाबतीत जी घटना घडली. ती आणखी कुणाच्याही मुलांच्या बाबतीत न घडो अशा भावना त्या मुलांच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network