Parbhani Accident News : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड परळी रोडवरील दगडवाडी पाटील जवळ आज बुधवार १३ जुलै रोजी सकाळी रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

parbhani gangakhed parli accident news the driver lost control and the ambulance overturned the driver died on the spot (1)
चालकाचा ताबा सुटला, रुग्णवाहिका पलटी, भीषण अपघात चालकाचा जागीच मृत्यू

हायलाइट्स:

  • चालकाचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका पलटी होऊत अपघात
  • भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
  • परभणी गंगाखेड परळी रोडवर घडली घटना
परभणी : गंगाखेड परळी रोडवरील दगडवाडी पाटीलजवळ आज बुधवार १३ जुलै रोजी सकाळी रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गजानन चिलगर असे मयत चालकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गंगाखेड येथील एक रुग्णवाहिका अंबाजोगाई येथील रूग्णालयात रूग्णाला सोडून गंगाखेडकडे परत येत होती. रुग्णवाहिका गंगाखेड परळी रोडवरील दगडवाडी जवळ आली असता चालकाचा अचानक रूग्णवाहिकेवरील ताबा सुटला. त्यामुळे रूग्णवाहिका रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातामध्ये चालक गजानन यांचा चिलगर मृत्यू झाला आहे.

महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार की नाही? रुपाली चाकणकरांनी ठामपणे दिलं उत्तर
अपघात झाल्यानंतर वाहनधारकांनी रूग्णवाहिकेतील चालकाचा मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी तो शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सदरील घटनेमुळे गजानन चिलगर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यास आता किती पदं मिळणार? बांठिया आयोगाचा अहवाल काय सांगतो?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : parbhani gangakhed parli accident news the driver lost control and the ambulance overturned the driver died on the spot
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here