औरंगाबाद : एका महिलेच्या गर्भाशयात असलेला दीड किलो वजनाचा गोळा काढण्याची किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगीत लाखोंचा खर्च येणार होता. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अवघ्या २६० रुपयात यशस्वीरीत्या करण्यात आली. यामुळे सर्वच स्तरातून डॉक्टरांचं कौतूक होत आहे.

वाळूज औधोगिक वसाहतीत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीत गोळा असल्याचे समोर आले होते. खाजगीत शस्त्रक्रिया करण्यासाठी लखाचे खर्च सांगण्यात येत होते. एवढा खर्च झेपणारा नसल्याने व असह्य वेदना होत असल्याने महिला चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली.

खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य

महिलेची सर्व वैधकीय पार्श्वभूमी जाणून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. स्त्रीरोग विभागाचे डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सोमवारी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून दीड किलोचा गोळा काढला. शस्त्रक्रियेत गर्भपिशवीही काढावी लागली. दीड तास शस्त्रक्रिया चालली. डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली जाधव, परिचारिका धारकर, वानखेडे, कर्मचारी अभिषेक आदींनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी मार्गदर्शन केले.

अनेक महिलांना गाठीचा त्रास जाणवत नाही, एखाद्या वेगळ्याच आजारासाठी तपासणी केली जाते. त्यावेळी गर्भाशयात गाठी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येते. गर्भाशयातल्या कोणत्या भागात गाठ यावर उपचार अवलंबून असते. अनेकवेळा गर्भाशयाच्या भिंतीवर गाठी येत असतात. ३० ते ५० वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.

Navneet Rana: आदिवासी पित असलेलं पाणी पिण्यास नवनीत राणांचा नकार, कार्यकर्त्यांना म्हणाल्या तुम्हीच पिऊन दाखवा
लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असल्याने गाठी होण्याचे प्रमाण व धोका अधिक असतो. ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ ३७६ कोटींचं हेरॉइन; ड्रग्ज लपवण्यासाठी असं काही केलं की PHOTO पाहून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here