मुंबई : “मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आपण शेतात काम केलेले आम्ही पाहिले आहे. शेतात काम करत असतानाच फोटो आपण सोशल मीडियावर टाकले आहेत. पण केवळ फोटो टाकू नका तर आमच्या हक्काचे आम्हाला पैसे द्या”, असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. “कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती असूनही एवढ्या मोठ्या संख्येने लोक मोर्चासाठी आले आहेत. आज आम्ही सगळे छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचे भाले होतील”, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.

नियमित पीक कर्ज भरणाऱ्या बळीराजाच्या खात्यावर १ जुलैला ५० हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदा शेतकऱ्यांना मिळालं नाही. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. धो धो कोसळणाऱ्या पावसात देखील हजारो शेतकरी मोर्चासाठी आले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी क्रांतिदिनापर्यंत म्हणजेच ९ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

राजू शेट्टी म्हणाले, “आज छत्र्या घेऊन आलो आहे. उद्या याचे भाले होतील, याचं भान राज्य सरकारने ठेवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो पाहिले आहेत. पण केवळ फोटो टाकू नका. आमचे हक्काचे पैसे आम्हा शेतकऱ्यांना द्या. तुम्हाला शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील”.

“उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले. निवेदनाची नाटकं करून काही होणार नाही. गेल्या वेळी देखील बैठकीला माझ्या अगोदर हे खासदार गेले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीतील पैशाचे काय झाले, त्या 135 रुपयांपैकी अजूनही 15 रुपये द्यायचे आहेत”, असा टोला त्यांनी खासदार धैर्यशील माने यांना लगावला.

‘थोडा काळ थांबा, उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल’
ट्विट करण्यापेक्षा पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा : राजू शेट्टी

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलैपासून पैसे जमा होणार होते, त्याला आपण स्थगिती का दिली? तुम्ही आता केलंय असचं ट्विट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केले होते, पण अखेर त्यांचा भ्रमनिरासच झाला”.

“त्यावेळी आमची फसवणूक झाली आहे. या निर्णयाला शेतक-यांचा विश्वास बसण्यासाठी ट्वीट करण्यापेक्षा शासन निर्णय करा व कधीपासून पैसे जमा करणार त्याची तारीखही जाहीर करा”.

अगोदर स्थगिती का दिली? ट्विट करण्यापेक्षा पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा : राजू शेट्टी
शेट्टींच्या मोर्चाआधी धैर्यशील मानेंनी टायमिंग साधलं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर १० मिनिटांत निर्देश

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी हे ट्विट करताच राजू शेट्टींनी व्हिडीओ जारी करत आधीचे मुख्यमंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांमधल्या निर्णायातील दोष दाखवून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here