Jayant Patil on Maharashtra Politics | सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

 

Jayant Patil Uddhav Thackeray (1)
जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे
  • सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे
मुंबई: शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप झुगारून मतदान केले आहे. आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्याचा निवाडा करण्यासाठी खंडपीठ नेमणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये या सगळ्याचा निकाल लागेल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेले आहे. त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होईल. त्यासाठी खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्धच्या बंडामागे शरद पवारांचा हात: दीपक केसरकर
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार की नाही? रुपाली चाकणकरांनी ठामपणे दिलं उत्तर
राष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन

देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले होते. महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी शिवसेना महाविकास आघाडीसोबत जाऊन यशवंत सिन्हा यांना मतदान करेल, अशी आशा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. यावरुन वादंग निर्माण झाला होता. जयंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, नेहेमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. यापुर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठींबा दिला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena uddhav thackeray will be again cm after supreme court constitutional bench verdict says ncp jayant patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here