प्रियांका आणि निक तर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांशी शेअर करत असतात. सध्या या दोघांचे फोटो गाजत आहेत. लेक मालतीला घरीच सोडून प्रियांका आणि निक हे पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. ताहो तलावाकाठी प्रियांका आणि निक यांचे हे रोमँटिक फोटो बघून चाहत्यांच्या कमेंटसनाही उधाण आलं आहे.
प्रियांका चोप्रा आता बॉलिवूडपासून लांब गेली असली तरी ती नवरा निकसोबत अमेरिकेत संसार करत आहे. दोघंही सतत त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या प्रियांका आणि निक सुट्टीवर गेले असून ते खूप एन्जॉय करत आहेत. दोघांनी ताहो तलावाकाठीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. निकने ब्लॅक ड्रेस घातला आहे तर प्रियांका ऑरेंज रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. चाहते त्यांच्या या लुकला पसंती देत आहेत. या फोटोला निकने मॅजिक आवर अशी कॅप्शन दिली आहे.
पर्यटनाचा आनंद घेत असताना निक आणि प्रियांका गोल्फ खेळण्यातही रमले आहेत. यावेळी पिगीचॉप्स नवरा निकला चिअरअप करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमेरिकेतील नेवाडामधील ताहो तलाव परिसरात या दोघांचा सध्या मुक्काम आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रियांका आणि निक हे त्यांच्या मालती या मुलीसोबत वेळ घालवत होते. आता मालतीला घरी ठेवून ही जोडी एकमेकांच्या सहवासात दंग झाली आहे.