त्याशिवाय, संपूर्ण कोकण, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.
हेही वाचा –उत्साही पर्यटकांना पोलीस म्हणतात, जानेका नहीं; मलंगगड परिसरात पर्यटकांना ‘नो एन्ट्री’
आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता होती. तर अधूनमधून वादळी वारे ४५- ५५ किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता होती. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस सुरुये. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर लोकलची वाहतूकही मंदावली आहे.
हेही वाचा –चिखली गावावर पुन्हा काळे ढग, ग्रामस्थ धास्तावले, स्थलांतराची तयारी सुरू
तर, आज भरतीमुळे मरीन ड्राईव्ह येथील निर्माणाधीन कोस्टल रोड परिसरात मोठ्या लाटा आदळत असल्याचं पाहायला मिळालं.

मरीन ड्राईव्ह परिसरातील किनाऱ्याला लाटांनी झोडपलं
Mumbai Rain: पावसामुळे वाहतुकीला ब्रेक, अंधेरीहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम