man carries street dogs, पावसात भिजणाऱ्या भटक्या कुत्र्याला मायेचा आधार, एका फोटोपुढे हजार शब्द फिके! – a man carries street dogs in her arms to help them cross the flooded road in pune baner
पुणे : मनुष्याला उपजत काही गुण मिळालेत, त्यातील प्राणीमात्रावर दया करा हे प्रत्येक धर्माचरणात मूलभूत तत्व आहे. पण हे तत्व किती जण अंगिकारतात, हा संशोधनाचा विषय आहे. पण हेच तत्व आचरणात आणणाऱ्या पुण्यातील एका अवलियाचा फोटो समोर आला आहे. मुसळधार पावसात या बहादर गड्याने आपल्या छत्रीत एका कुत्र्याला आसरा दिला आहे. केवळ आसराच दिला नाही, तर त्याला आपल्या काखेत घेऊन रस्ता ओलांडून कुत्र्याला सुरक्षित ठिकाणी नेवून ठेवतो आहे. हा फोटो पाहिल्याबरोबर अनेकांच्या तोंडून बहाद्दराच्या भूतदयेचं कौतुक होत आहे.
राज्यात जिकडे तिकडे मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत आहेत. अशा परिस्थितीत माणसाला चालणं कठीण होऊन बसलंय, तिथे भटक्या कुत्र्यांची काय अवस्था होणार… पण अजूनही समाजात काही संवेदनशील माणसं आहेत, ज्यांना दुसऱ्या मनुष्याचं, प्राणीमात्राचं दु:ख आपलं वाटतं. पुण्यातील बाणेरमध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना एक अवलियाने पावसात भिजणाऱ्या भटक्या कुत्र्याला उचलून छत्रीत घेतले. त्याला पोटाशी कवटाळून सुरक्षित ठिकाणी नेले. प्रेमभावना जितकी उत्कट सांगितली जाते, तितकी ती सहजतेने प्रकट होत नाही. पण हा फोटो पाहून अनेक विशेषणं तोंडातून आपसूक बाहेर पडतात. Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ पुण्याला पावसाने झोडपले, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाचा वेग वाढताना पाहायला मिळत आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पुणेकरांना चांगलंच झोडपलंय. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपाखाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ. शाळांना १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Pune School: पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे शनिवारी पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.