dhfl bank fraud case: देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असलेल्या डीएचएफएल प्रकरणात सीबीआयनं महत्त्वाची कारवाई केली आहे. उद्योगपती अजय नवंदरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. नवंदर हा अंडरवर्ल्डचा हस्तक असून त्यानं डीएचएफएल घोटाळ्यातील पैसा देशाबाहेर पाठवल्याची माहिती सीबीआयला मिळाली.

 

dhfl
संग्रहित छायाचित्र
मुंबई: देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असलेल्या डीएचएफएल प्रकरणात सीबीआयनं महत्त्वाची कारवाई केली आहे. उद्योगपती अजय नवंदरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. नवंदर हा अंडरवर्ल्डचा हस्तक असून त्यानं डीएचएफएल घोटाळ्यातील पैसा देशाबाहेर पाठवल्याची माहिती सीबीआयला मिळाली. त्यानंतर सीबीआयनं नवंदरच्या मुसक्या आवळल्या. आता त्याला दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आलं आहे.

अजय नवंदरनं घोटाळ्यातील पैसा भारताबाहेर पाठवला. हे पैसे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि छोटा शकीलला दिले गेले असावेत आणि पुढे हाच पैसा भारताविरोधातील कारवायांमध्ये वापरण्यात आला, असा संशय सीबीआयला आहे. त्या अनुषंगानं नवंदरची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठीच त्याला दिल्लीला नेण्यात आलं आहे.

डीएचएफएल घोटाळ्यात वाधवान यांचं नाव आधीच समोर आलं आहे. वाधवान यांच्याकडून मिळालेले पैसे नवंदरनं अंडरवर्ल्डला दिल्याचा संशय आहे. त्यासाठी हवाला रॅकेटचा वापर करण्यात आला. नवंदरचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. यातील काही नेत्यांचे अंडरवर्ल्डशी जवळचे संबंध असू शकतात. त्यामुळे नवंदरच्या चौकशीतून बड्या राजकीय नेत्यांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cbi arrests businessman ajay ramesh nawandar in dhfl bank fraud case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here