शिवसेनेत बंडखोरी करून सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला होता. त्याबाबत कोर्टात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता याच याचिकेची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

 

cm eknath shinde to be questioned on misrepresentation of assets in affidavit given to election commission
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत?; त्या प्रकरणात पुणे कोर्टाचे चौकशीचे आदेश
पुणे : शिवसेनेत बंडखोरी करून सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला होता. त्याबाबत कोर्टात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता याच याचिकेची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. (cm eknath shinde to be questioned on misrepresentation of assets in affidavit given to election commission)

माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. पुणे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या प्रकरणी साक्षी पुरावे तपासण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४ आणि २०१९ साली ठाणे येथील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलामध्ये तफावत आहे, असे हरदास यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm eknath shinde to be questioned on misrepresentation of assets in affidavit given to election commission
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here