जळगाव : चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत एका सराईत गुन्हेगाराने स्वत:च हाताने हाताच्या नसा व गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिम्मी उर्फ दीपक बिपिन शर्मा (वय-२९) रा. गुरुकुल नगर, नंदुरबार असे जखमी संशयिताचे नाव आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

अमळनेर शहरात एक ठिकाणी आणि चोपडा शहरात दोन ठिकाणी अशा एकूण तीन ठिकाणी एकाच दिवशी घरफोड्या करून रोकडसह मुद्देमाल लांबविणारा हा आरोपी आहे. हा संशयित नंदुरबार शहरातील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी संशयित जिम्मी उर्फ दीपक विपिन शर्माला अटक केली होती. त्याला पुढील तपासासाठी चोपडा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना मंगळवारी सायंकाळी जिम्मी याने धारदार वस्तूने हाताच्या नसा व गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. त्‍यानंतर त्याला चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भुशी डॅमला जायचं ठरवलंय, थांबा; आधी ही बातमी वाचा….
अवघ्या तीन मिनिटात मोठी घरफोडी अन् करतो विमानप्रवास

घरफोडी करणारा जिम्मी उर्फ दीपक बिपिन शर्मा याने राज्यात विविध ३० ते ४० ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. संशयित जिमी शर्मा हा सराईत गुन्हेगार असून अवघ्या ३ मिनिटात मोठ्या स्वरूपाची घरफोडी करून मिळालेल्या पैशांनी मुंबई येथे जाऊन तेथून विमानाने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात येथे जाऊन मौजमजा करतो. परत पुन्हा त्याच ठिकाणी घरफोडी करून तेथून पुन्हा विमानाने परत इतर राज्यात जाऊन मौजमजा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दोघांनीही एक एक पाऊल पुढे या, दिपाली सय्यद यांचं शिंदे-ठाकरेंना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here