examinations scheduled for tomorrow canceled : मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

The University of Mumbai has announced that all the examinations scheduled for tomorrow have been canceled due to heavy rains
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द

हायलाइट्स:

  • मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द.
  • सततच्या अतिवृष्टीमुळे घेण्यात आला निर्णय.
  • इंजिनिअरिंग विद्याशाखेसह इतरही विद्याशाखेच्या परीक्षा रद्द.
मुंबई : सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. (all the examinations scheduled for tomorrow have been canceled due to heavy rains)

उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the university of mumbai has announced that all the examinations scheduled for tomorrow have been canceled due to heavy rains
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here