Authored by Maharashtra Times | Updated: Jul 13, 2022, 10:42 PM

भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात ते १-० अशा आघाडीने उतरतील. पण दुसरीकडे आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दुसरा सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि एक मोठी गोष्ट आता समोर आली आहे. दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारतापुढे कोणती वाईट बातमी आली आहे, पाहा…

 

प्रातिनिधीक फोटो (सौजन्य-ट्विटर)

हायलाइट्स:

  • भारताचा दुसरा सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे.
  • या सामन्ययापूर्वी भारतासाठी आता एक वाईट बातमी आली आहे.
  • भारतासाठी कोणती वाईट बातमी आली आहे, पाहा…
लंडन : इंग्लंडविरुद्धचा दुसरा वनडे सामना सुरु होण्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. दुसरा सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि त्याचवेळी भारतीय संघासमोर एक मोठी गोष्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी समजली जाते आणि या मैदानात खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. त्यामुले या मैदानात प्रत्येक खेळाडू रक्ताचे पाणी करून दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात ते १-० अशा आघाडीने उतरतील. पण दुसरीकडे आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

लॉर्ड्सच्या मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघासाठी आता एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी या मैदानाबाबतच आहे. कारण गेल्या १५ वर्षांत भारतीय संघाला एकदाही वनडे सामना जिंकता आलेला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील १५ वर्षांपूर्वी म्हणजेच ८ सप्टेंबर २००७ या दिवशी वनडे सामना खेळवण्यात आला होता. पण या सामन्यात इंग्लंडने भारतावर सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांची गाठ या मैदानात ११ सप्टेंबर २०११ या दिवशी पडली होती. हा सामना भारतीय संघ जिंकेल, असे वाटत होते. कारण या सामन्यात भारताने २८० धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि काही वेळाने पाऊस पडला. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार इंग्लंडया याववेळी २७१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. इंग्लंडचा संघ यावेळी २७० धावा करू शकला आणि हा सामना बरोबरीत सुटल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मैदानातील अखेरचा सामना हा १४ जुलै २०१८ साली खेळवण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंडने भारतावर ८६ धावांनी विजय साकारला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये या मैदानात भारताला इंग्लंडवर एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण यापूर्वी भारतीय संघाने लॉर्ड्सवर काही विजय मिळवले आहेत. पण गेल्या १५ वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत नेमकं काय घडलं हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the bad news for the indian team came before the 2nd odi against england, now it has come to the fore, now this big thing …
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here