Sangli Accident News : जिल्ह्यातील विटा – मायणी रस्त्यावरील नागेवाडी गावाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हायलाइट्स:
- कार आणि दुचाकीचा भीषण अपघात
- एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी
- सांगलीतील विटा – मायणी रस्त्यावरील घटना
भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या गाडीला जोरात धडक दिली. ज्यामध्ये दुचाकी आणि दुचाकीस्वार ५ फूट वर उडून गाडीच्या मागील बाजूला जाऊन पडले. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झाला आहे. अमोल माने (वय ३५) राहणार माहुली. खानापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र संकेश्वर माने रा. माहुली, खानापूर हा जखमी झाला आहे.
अमोल आणि संकेश्वर हे दोघेजण विट्याहून मायणीकडे निघाले होते त्यावेळी नागेवाडी येथे आले असता समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या गाडीला जाऊन जोरदार धडकल्याने हा अपघात घडला आहे. याप्रकरणी गाडी चालकाच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : a horrific car and two wheeler accident death the biker on the spot sangli accident news
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network