रायगड : कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज गुरुवारी रायगड जिल्ह्यातील सगळ्या माध्यमातील शाळा, महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी रात्री उशीरा सुट्टी जाहीर करणारे परिपत्रक जारी केलं.

रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस होत असून भारतीय हवामान खात्याकडून आजही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ओबीसींचा टक्का घसरणार?; आयोगाच्या शिफारशींमुळं ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी होण्याची चिन्हे

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना गुरुवारी सुट्टी जाहीर करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेशही देण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे पुन्हा भूगर्भीय सर्वेक्षण होणार

दरम्यान, राज्यभर सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here