hingoli flood news, पुराचं पाणी थेट बँकेत पोहोचलं; तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजली! – hingoli flood 12 lakh 22 thousand cash from sbi branch in kurunda village soaked in flood waters
हिंगोली : राज्याच्या विविध भागात मागील आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाचं थैमान सुरू असून ९ जुलैपासून कुरुंदा व परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. परिणामी नदीचे पाणी गावातील ‘एसबीआय’च्या शाखेत आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले होते. यामुळे जवळपास १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय कन्या पाठशाला, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, तसंच अंगणवाड्यांतही पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे गावातील सर्वच शाळा तीन दिवसापासून बंद आहेत. पाऊस थांबत नाही तोपर्यंत शाळा बंद राहतील, असं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालेलं नाही. जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिकेही पाण्याखाली गेली आहेत. जवळपास १९ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे.