Presidential election 2022 | आम्हाला अद्याप भाजप किंवा अन्य कोणाकडून द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठीचे निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे गुरुवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी द्रौपदी मुर्मू यांना आदिवासींचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणून पाठिंबा जाहीर केला होता, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

 

Draupadi Murmu (1)
द्रौपदी मुर्मू आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • द्रौपदी मुर्मू गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल होतील
  • द्रौपदी मुर्मू या मुंबई विमानतळानजीकच्या हॉटेलमध्ये आमदार आणि खासदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत
  • या बैठकीला २५० जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे
मुंबई: अवघ्या दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी मुंबईत येणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) पाठिंबा मिळवण्यासाठी मुर्मू या महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. परंतु, शिवसेनेने पाठिंबा देऊनही मुंबईतील बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे गटाला आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी लहान पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित असतील. परंतु, या सगळ्यापासून शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

दिल्लीत बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक पार पडली होती. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीविषयी चर्चा झाली. या बैठकीलाही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे उपस्थित होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या बैठकीचेही निमंत्रण नव्हते. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले की, आम्हाला अद्याप भाजप किंवा अन्य कोणाकडून द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठीचे निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे गुरुवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना आदिवासींचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणून पाठिंबा जाहीर केला होता, असे विनायक राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रपती निवडणुकीसाठीचं साहित्य दिल्लीहून मुंबईत आणलं, विमानात मतपेटीचंही काढलं तिकीट
द्रौपदी मुर्मू गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल होतील. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारती पवार असतील. द्रौपदी मुर्मू या मुंबई विमानतळानजीकच्या हॉटेलमध्ये आमदार आणि खासदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या बैठकीला २५० जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
खासदारांचा ‘तो’ सल्ला ऐकला अन् उद्धव ठाकरेंनी लगेच निर्णय घेतला; नवा सेतू बांधला?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. यासंदर्भात मातोश्रीवर बैठकही झाली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena chief uddhav thackeray not invited to meet bjp presidential election 2022 candidate droupadi murmu day after backing her
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here