स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पेटत्या चितेवर दहनशेड कोसळले. मलब्याखाली दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे मंगळवारी घडली.

 

shed
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळः स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पेटत्या चितेवर दहनशेड कोसळले. मलब्याखाली दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे मंगळवारी घडली.

जमशेटपूर या गावातील मधुकर श्यामा आडे याचे ११ जुलै रोजी निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइक व गावकरी स्मशानभूमीत जमले होते. मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याठिकाणी असलेल्या सिमेंटच्या शेडखाली अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. नातेवाइकांनी शेडखाली चिता रचली. विधिवत सर्व पूजा झाल्यावर चिता पेटविण्यात आली. नातेवाईक झाडाखाली बसले असताना अचानक सिमेंटचे शेड खांबासह खाली कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

वाचाः औषधे नाहीत; आजारी पडू नका; तीव्र औषधटंचाईमुळे श्रीलंकेत डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन

शेडच्या मलब्यात दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा चिता पेटविण्यात आली. तीन वर्षांपूर्वी जमशेटपूर येथील दहनशेड बांधण्यात आले होते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

वाचाः पुराचं पाणी थेट बँकेत पोहोचलं; तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजली!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shed of cement collapsed on a crematory in yavatmal
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here