जुन्नर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची कामे आपुर्वावस्थेत आहेत. पुलाला कठडे नसल्याने संबंधित व्यक्ती त्या पुलावरून जात होती. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर होता. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती व्यक्ती पाण्यासोबत वाहून गेली. वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
एकनाथ बबन रेंगडे असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या जुन्नरमध्ये तुफान पाऊस बरसत आहे. अनेक नदी, नाले, ओढे अक्षरश: ओसंडून वाहत आहेत. त्यात ज्या पुलांना कठडे नाहीत, त्याचा अंदाज चालणाऱ्यांना येत नाही. त्यातूनच हा प्रकार घडला.
खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य
तसेच श्रीक्षेत्र लेण्याद्री येथील डोंगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने थेट डोंगरावरून पायरी मार्गाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रौद्र रूप प्राप्त झाले आहे. मात्र अशातही जीव धोक्यात घालून भाविक आणि पर्यटक डोंगरावर जात आहेत. लेण्याद्री डोंगरावर पडत असलेला सर्व पाऊस याच पायरी मार्गाने जोरात खालच्या दिशेने येत असताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.