खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य
दोन दिवस ‘रेड अलर्ट’
येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )
उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही १३ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून यामुळे सर्वत्र पाऊस कोसळेल.
दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाडा (Marathawada )- १३ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.
पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ (East Vidarbha – West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात १३ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.