नाशिक : मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सध्या सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडली असून गावांना पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. अशात नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचा स्टंट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने केलेलं धाडस त्याला महागात पडलं आहे. कारण अद्याप तरुणाचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.

जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी सुरूच असून अशीच एक खळबळजनक घटना मालेगावात समोर आली असून गिरणा नदीत पुराच्या पाण्यात पुलावरूनप स्टंट बाजी करताना तरुण वाहून गेला. नईम अमीन असं या तरुणाचं नाव असून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा अद्याप कुठेही शोध लागला नाही. रात्रीपर्यंत शोध सुरू होता पण अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

Junnar Rain Video : बघता-बघता ओढ्यात वाहून केला व्यक्ती, घटनेचे थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद

खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा, अशा वारंवार सूचना दिल्या जात असताना आताची तरुणाई अशा प्रकारे धाडस दाखवत आहे. पण यामुळे जीवाला धोका आहे, ही बाब लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट; वाचा आजचा वेदर रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here