मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचं दीर्घ उपचारानंतर ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. लता दीदींच्या निधनानंतर त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम असावं, असं दीदींचं स्वप्न होतं. दीदींनी त्याचं हे स्वप्न अनेकदा मुलाखतींमध्येही सांगितलं होतं. त्यांचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
‘इमर्जन्सी’चा फर्स्ट लूक आला समोर, कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत; तर श्रेयस तळपदे…
लता दीदींनी पाहिलेलं स्वर माऊली या ज्येष्ठ कलाकारांसाठीच्या वृद्धाश्रमाचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू आहेत.

सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या आयुष्याचा शेवट एकाकी झाला. कलेसाठी जगणाऱ्या या कलाकरांना शेवटच्या क्षणांमध्येही कोणाचा सहवास मिळाला नाही, त्यांच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे, याचं उत्तर शोधण्यापेक्षा ही वेळ भविष्यात कोणत्याही कलाकारावर येऊ नये, यासाठी लता दीदींनी एक स्वप्न पाहिलं. ज्येष्ठ कलाकारांसाठी उतरत्या वयात हक्काचा सहवास मिळावा,त्यांची काळजी घेणार कुणी तरी असावं, यासाठी स्वर माऊली या वृद्धाश्रमाची दारं उघडली असतील, असं स्वप्न त्यांनी पाहिलं.

लता दीदींचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्या कुटुंबियांकडूनही प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकमध्ये हे वृद्धाश्रम उभारलं जाणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील या संदर्भात एक ट्वीट केलं आहे.

स्वर माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून हे वृद्धाश्रम उभारलं जाणार आहे. उषा मंगेशकर, रचना शाह या संस्थेच्या संस्थापक आहेत. अद्ययावत सोयी-सुविधा असलेलं हे वृद्धाश्रम उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उषा मंगेशकर यांनीही सांगितलं आहे.

VIDEO: लग्नाआधीच हार्दिक-अक्षयाचं रस्त्यावर भांडण, अभिनेत्रीने पकडली होणाऱ्या नवऱ्याची कॉलर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here