गुजरातच्या बडोद्यातील वाघोडिया परिसरात मुसळधार पावसानंतर चार फुटाची मगर आढळून आली. मगर पाहून स्थानिकांना धक्काच बसला. कारण वाघोडिया परिसर विश्वामित्री नदीपासून बराच दूर आहे. या नदीत ३०० पेक्षा अधिक मगरी आहेत.

मगरी कोणाच्याही दृष्टीस न पडता नाल्यांमधून कित्येक किलोमीटर प्रवास करतात, अशी माहिती प्राणी मित्र नेहा पटेल यांनी दिली. शहरात असलेल्या नाल्यांमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी मगरी आढळून आल्या आहेत, असं पटेल यांनी सांगितलं. बडोदा आणि आसपासच्या परिसरातून मगरींची सुटका करण्याचं काम पटेल करतात.
बडोद्यामध्ये जवळपास ४१० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. शहरातील बहुतांश भागांना हे नाले जोडलेले आहेत. शहरात साचलेलं पावसाचं पाणी विश्वामित्री नदीपर्यंत सोडण्याचं काम नाले करतात. आम्हाला प्रत्येक पावसाळ्यात नाल्यांमध्ये मगर दिसल्याचं किमान २५ ते ३० कॉल येतात, अशी माहिती पटेल यांनी दिली. मगरी सातत्यानं प्रवास करत असल्यानं त्यांच्या ठावठिकाण्याची नेमकी माहिती ठेवणं अवघड असल्याचं पटेल म्हणाल्या.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network