Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची बँटिंग (Rains Updates) आजही सुरूच आहे. पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा देखील पावसामुळं बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे.  इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलली आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी

20 जुलै रोजी राज्यभरात ही परीक्षा होणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी ची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी राज्यभर घेतली जाणार आहे राज्यभरातून इयत्ता पाचवीचे 4,10,395 आठवीचे 2,99, 255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दिलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमुळं अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिष्यवृती परीक्षा 20 जुलै ऐवजी 31 जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Mumbai Rains LIVE: मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत,  पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट

PHOTO : नरवीर तानाजींची शस्त्रे ज्या झाडात सापडली ते 350 वर्षांचं विशाल वृक्ष कोसळला

Pune Rain News: अतिवृष्टीचा अंदाज असताना पुण्यात पावसाने घेतला ‘ब्रेक’; शहरात ढगाळ वातावरण

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

1 COMMENT

  1. Great capital growth tһanks tߋ Quantum Аi makеѕ my trazding easier no neеd to stay at aⅼl tіmеs in front of mү monitor tߋ catch
    aⅼl avaіlable transactions. Thɑnk you to the Quantm team.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here