Nilesh Rane slams Deepak Kesarkar | दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही विचारणार नाही. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची त्यांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या ताब्यात एकही नगरपालिका किंवा नगरपंचायत नाही. शिंदे साहेबांमुळे त्यांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्यासोबत आहोत.

हायलाइट्स:
- २०२४ पर्यंत आम्ही त्यांना गोव्यातच पाठवणार होतो
- जेणेकरून कोकणात दीपक केसरकर नावाचा कोणता आमदार होता, हे लोकांच्या लक्षातही राहिलं नसतं
- आता योगायोगाने त्यांचे राजकारण जिवंत झाले आहे
यावेळी निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना अक्षरश: धारेवर धरले. दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही विचारणार नाही. दीपक केसरकर यांची त्यांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या ताब्यात एकही नगरपालिका किंवा नगरपंचायत नाही. शिंदे साहेबांमुळे त्यांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्यासोबत आहोत. खरंतर दीपक केसरकर यांना बोलायची गरज नव्हती. तरी त्यांनी स्वत:चा शहाणपणा गाजवायचा प्रयत्न केला. आपण युतीत आहोत. आम्हाला जेवढी तुमची गरज आहे, तेवढीच तुम्हालाही आमची गरज आहे, हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना भाजपच्या लोकांवर बोलायचा अधिकारी नाही. आम्ही त्यांची दखलही घेत नाही. आता कुठे दीपक केसरकर बोलायला शिकले आहेत. मात्र, ते कधीकधी भरकटतात. ते राणे साहेबांविषयी काही बोलले तरी आम्ही ऐकून घेणार नाही. उद्या केसरकर मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्हाला त्याचा थोडाही फटका बसणार नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp leader nilesh rane slams eknath shinde camp spokeperson deepak kesarkar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network