साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो-६५० औषध प्रत्येक घरात आढळतं. करोना काळात अनेकांनी डोलो-६५० गोळी घेतली. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली.

या प्रकरणी कंपनीची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कंपनीनं ई-मेलला उत्तर दिलं नाही. सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार, १००० हजार कोटी रुपयांचे मोफत गिफ्ट कंपनीकडून डॉक्टरांना देण्यात आले. कागदपत्रं आणि डिजिटल डेटामधून ही माहिती उघडकीस आली आहे. ही कागदपत्रं आणि डिजिटल डेटा छाप्यांच्या दरम्यान आयकर विभागाच्या हाती लागला. आपल्या उत्पादनाचा वापर वाढावा यासाठी कंपनीनं मोफत गिफ्ट वाटल्याचं स्पष्ट झालं आहे.
करोना काळात रेकॉर्डब्रेक विक्री
डोलो-६५० औषधाची किंमत कमी आहे. मात्र या औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सनं विक्री करण्यासाठी वापरलेला मार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. करोना संकटकाळात डोलो-६५० ची विक्री कित्येक पटींनी वाढली होती. २०२० मध्ये करोनाचं संकट गहिरं झालं. त्या कालावधीत ३५० कोटी टॅबलेट विकल्या गेल्या होत्या. एकाच वर्षात कंपनीनं जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network