भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका बस चालकाची हत्या झाली. या हत्या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस चालकाचा मृत्यू सर्पदंशानं झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र पोलीस तपासातून वेगळीच माहिती पुढे आली. बस चालकाची हत्या त्याच्याच मित्रानं केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्या केल्यानंतर त्याच्याच मित्रानं मेलेला कोब्रा चालकाच्या मृतदेहाजवळ आणून ठेवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पित असताना बस चालक आणि त्याच्या मित्राचं भांडण झालं. त्याच दरम्यान मित्रानं चालकाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. भोपाळच्या मिसरोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

१३ जुलैला बस चालक नवल सिंहचा मृतदेह त्याचा मित्र संदीप वाघमारेच्या घरात आढळून आला. नवल सिंह आणि संदीप चांगले मित्र होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना मृतदेहाजवळ एक कोब्रा मृतावस्थेत आढळून आला. याबद्दल पोलिसांनी वाघमारेची चौकशी केली. रात्री सगळे मित्र दारू प्यायलो. जास्त झाल्यानं नवल माझ्याच घरी झोपला. सकाळी पाहिलं त्यावेळी तो मृतावस्थेत होता, अशी माहिती वाघमारेनं दिली.
तीन मुलींनंतर मुलगा झाला, म्हणून देवीला तरुणाचा बळी दिला! आरोपीच्या जबाबानं पोलीस सुन्न
नवलच्या मृतदेहाशेजारीच कोब्रा मृतावस्थेत पडला असल्यानं नवलचा मृत्यू सर्पदंशामुळेच झाला असावा असं सगळ्यांना वाटलं. पोलिसांनी नवलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र शवविच्छेदन अहवालाच कुठेच सर्पदंशाचा उल्लेख नव्हता. नवलच्या शरीरावर कुठेत सर्पदंशाची जखम नाही. त्याच्या शरीरात विषदेखील आढळून आलेलं नाही, अशी माहिती अहवालात होती. त्यातून पोलिसांना प्रकरणाचा अंदाज आला.
विमानतळावर जोडप्याकडे सापडल्या ४५ हँडगन; शस्त्रास्त्र साठा पाहून कस्टम अधिकारीही चक्रावले
शवविच्छेदन अहवाल हाती येताच पोलिसांनी संदीप वाघमारेची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला संदीपनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. नवलसोबत वाद झाला. त्यावेळी त्याच्या तोंडात कापड टाकून त्याची हत्या केल्याचं वाघमारेनं सांगितलं. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी वाघमारेंनी संपूर्ण कथा रचली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here