केरळच्या कोच्चीमध्ये एका तरुणानं दिवसाढवळ्या त्याच्या मित्रावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्यानं स्वत:वर वार केले. कोच्चीतील कलूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. २४ वर्षांच्या ख्रिस्तोफर डिक्रूजनं चाकूनं वार करून घेत आत्महत्या केली.

मैत्री तुटल्यानंतर ख्रिस्तोफरनं सचिनला भेटण्यासाठी मेसेज केला. आपल्यतील वाद सोडवू असं आवाहन ख्रिस्तोफरनं सचिनला केलं होतं. त्यानंतर दोघे कोच्चीमध्ये भेटले. मैत्री कायम ठेवण्याचा आग्रह ख्रिस्तोफरनं सचिनकडे धरला. मात्र सचिननं असमर्थतता दर्शवली. त्यामुळे ख्रिस्तोफरला राग आला.
ख्रिस्तोफरनं स्वत:च्या बॅगेत असलेली मिरची पावडर बाहेर काढली आणि ती सचिनच्या डोळ्यांत फेकली. यानंतर ख्रिस्तोफरनं सचिनचा गळा कापला. गंभीर जखमी असलेल्या सचिनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर स्वत:च्या हातावर आणि मानेवर वार केलेल्या ख्रिस्तोफरचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network