मात्र, याबाबत खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा शिंगरोबा मंदिराचा व्हिडिओ खोटा असून कुणाला याबाबत शंका असल्यास त्यांनी खालापूर तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार तांबोळी यांनी केलं आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल न करण्याचे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आलं आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरायला येताना काळजी घ्यावी किंवा या काळात फिरायला बाहेर पडू नका, असं देखील सांगण्यात आलं आहे.
लोणावळा, खंडाळा परिसरात सध्या पाऊस सुरू असून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. अनेक धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो व्हिडीओ काढत आहेत. त्यातच त्यांना त्यांच्या प्राणाला देखील मुकावं लागत आहे. त्यामुळे कुठलाही धोका पर्यटकांनी पत्करू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
‘हे केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ’, बाळासाहेब थोरातांचा मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांना टोला