ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना या निर्णयाच्या माध्यमातून मोठा धक्का दिला आहे.

 

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरु ठेवलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्यानं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतल्यानं आक्षेप घेतला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

बातमी अपडेट होत आहे….

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm eknath shinde will review uddhav thackeray decision of name change of aurangabad and osmanabad
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here