मुंबई : प्रख्यात अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आयपीएलचा संस्थापक ललित मोदी (Lalit Modi) याला डेट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर सोशल मीडियावर फक्त सुष्मिता आणि ललित यांच्याबद्दलच बोललं जाऊ लागलं. ललितने ट्विटर अकाउंटवर सुष्मितासोबतचा फोटो शेअर करत ही बातमी दिली. फरार व्यावसायिकाने सुष्मिताचा बेटर हाफ असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. वयाच्या ४६ व्या वर्षी सुष्मिता अखेर विवाह बंधनात अडकणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

चाललंय काय! अखेर सुष्मिता- ललित मोदीच्या अफेअरवर आली भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया

काही महिन्यांपूर्वी सुष्मिता आणि रोहमन शॉल चं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर हे दोघं पुन्हा एकत्र दिसल्यानं त्यांचं पॅचअप होणार अशी चर्चा होती. परंतु आता ललित मोदी याच्याशी तिनं लग्न केल्याची बातमी समोर आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुष्मिताच्या कथित लग्नाच्या बातमीमुळे तिचं खासगी आयुष्य आणि तिच्या आधीच्या प्रेमप्रकरणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

असं आहे सुष्मिताचं खासगी आयुष्य

सुष्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ मध्ये हैदराबाद इथं झाला. तिच्या आईचं नाव शुभ्रा सेन आणि वडिलांचं नाव सुबीर सेन आहे. सुष्मिताचे वडील भारतीय हवाई दलामध्ये विंग कमांडर होते आणि आई ज्वेलरी डिझाईनर म्हणून काम करायची. सुष्मिताला नीलम आणि राजीव हे दोन भावंड आहेत. सुष्मितानं २५ व्या वर्षी रेनीला तर १० वर्षांनी अलिशा या दोन मुलांना दत्तक घेतलं.

love in the air! सुष्मिता आणि ललित मोदीचे रोमॅन्टिक PHOTOS

सुष्मितानं १९९४ मध्ये १८ व्या वर्षी मिस इंडिया आणि त्यानंतर मिस युनिव्हर्स हा किताब मिळवला. मिस इंडिया स्पर्धेमध्ये तिनं ऐश्वर्या रायला पराभूत केलं होतं. सौंदर्यवतीचा मान मिळवल्यानंतर सुष्मितानं अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं. १९९६ मध्ये तिचा दस्तक हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर तिनं १९९७ मध्ये तामिळ सिनेमात काम केलं होतं. सुष्मितानं तिच्या करीअरमध्ये अनेक हिंदी सिनेमांत काम केलं. त्यामध्ये ‘हिंदुस्तान की कसम’, ‘ज़ोर’, ‘सिर्फ तुम’, ‘बीवी नंबर 1’, ‘नायक’, ‘बस इतना सा ख्वाब है’, ‘आंखें’, ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘फ़िलहाल’, ‘मैं हूं ना’, ‘पैसा वसूल’, ‘चिंगारी’, ‘मैंने प्यार क्यों किया?’, ‘बेवफा’, ‘किसना:द वारियर पोएट’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘कर्मा और होली’, ‘दूल्हा मिल गया’, ‘नो प्रॉब्लम’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश होता.

सुष्मिता आणि तिची अफेअर्स

सुष्मिताच्या अभिनयापेक्षा तिच्या अफेअर्सची चर्चा कायम असते. सुष्मिताच्या अभिनयाच्या करीअरच्या सुरुवातीपासून तिच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा सुरू आहेत. सुष्मिता आणि तिचे बॉयफ्रेंड हे कायम गॉसिपचा विषय असते.

सुष्मिता आणि विक्रम भट्ट

सुष्मिता आणि विक्रम भट्ट (Sushmita Sen and Vikram Bhatt Affair)

सुष्मिता सेनच्या अफेअरची यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये पहिलं नाव येते ते सिने दिग्दर्शक विक्रम भट्ट याचं. या दोघांच्या अफेअरला सुरुवात झालं त्यावेळी विक्रमचं लग्न झालेलं होतं. दस्तक सिनेमाच्या सेटवर सुष्मिता आणि विक्रमची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर अनेक वर्षे हे दोघं रिलेशनमध्ये होते. या दोघांच्या नात्यामुळे विक्रम आणि त्याची बायको आदितीमध्ये वितुष्ट आलं आणि ते विभक्त झाले. परंतु कालांतरानं विक्रम आणि सुष्मिता यांच्यातही दुरावा आला.

सुष्मिता आणि संजय नारंग

सुष्मिता आणि संजय नारंग (Sushmita Sen and Sanjay Narang Affair)

विक्रम भट्टशी नातं तुटल्यानंतर सुष्मिताचं हॉटेल व्यावसायिक संजय नारंग याच्याशी सुत जुळलं. दोघजण अनेक पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमात एकत्र दिसायचे. परंतु काही दिवसांनी हे दोघं वेगळे झाले. त्याचं कारण कधीच समोर आलं नाही.

सुष्मिता आणि रणदीप हुड्डा

सुष्मिता आणि रणदीप हुड्डा (Sushmita Sen and Randeep Hooda Affair)

सुष्मिता आणि अभिनेता रणदीप हुड्डा हे देखील काही काळ रिलेशनमध्ये हबोतं. कर्मा और होली या सिनेमामुळे ते दोघं एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर अनेकदा दोघं एकत्र फिरताना दिसले. हे दोघंजण तीन वर्षे रिलेशनमध्ये होते. त्यानंतर हे दोघं विभक्त झाले. परंतु आजही त्यांच्यात मैत्रीचं नातं कायम आहे.

सुष्मिता आणि वसीम अक्रम

सुष्मिता आणि वसीम अक्रम (Sushmita Sen and Waseem Akram Affair)

सुष्मिता सेनचं नाव पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम याच्याशीही काही काळ जोडलं गोलं होतं. या दोघांनी एक टीव्ही कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन केलं होतं.अर्थात दोघांनी त्याचं नातं मीडियासमोर कधीच स्वीकारलं नाही. परंतु ते दोघं वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या.

सुष्मिता आणि अनिल अंबानी (Sushmita Sen and Anil Ambani Affair)

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशीही सुष्मिताचं नाव जोडण्यात आलं होतं. टीना मुनीम हिच्याशी लग्न झाल्यानंतर अनिल आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत होतें. परंतु या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणं भाष्य केलं नाही.

सुष्मिता आणि रोहमन शॉल

सुष्मिता आणि रोहमन शॉलचं (Sushmita Sen and Rohman Shawl Affair)

सुष्मिताचं सगळ्यात अलिकडंच अफेअर होतं ते रोहमन शॉलबरोबरचं. रोहमन सुष्मितापेक्षा लहान असूनही त्यांची जोडी चाहत्यांना आवडली होती. या दोघांनी लग्न करावं अशी अपेक्षा होती. परंतु काही दिवसांपूर्वी ते दोघं विभक्त झाले. याशिवाय सुष्मिताचं नाव रितिक भसीन,मुदस्सर अजीज,इम्तियाज खत्री, बंटी सचदेव यांच्याशीही जोडलं गेलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here