सोनम कपूरला नुकतंच अनेकांनी मुंबईत पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचं तेज चढलं होतं. पिवळ्या रंगाचा ड्रेस तिनं घातला होता. चेहऱ्यावर मास्क लावला होता. फॅन्स तिच्या लूकचं कौतुक करतायत. होणाऱ्या बाळाला शुभेच्छा देत आहेत. एका फॅननं लिहिलं आहे, ती खूपच देखणी दिसतेय. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, मला नव्हतं माहीत तिच्यावर कपडे इतके खुलून दिसतात ते. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलंय, तू खूपच गोड दिसतेय. अनेकांनी तिच्या प्रेग्नन्सी ग्लोवरही कमेंट केल्या आहेत.
डोहाळे जेवणासाठी लोटणार बाॅलिवूड
सूत्रांच्या माहितीनुसार, डोहाळे जेवणाचा कार्यक्कम सोनमची आई, सुनीता कपूरची बहीण कविता सिंहच्या घरी वांद्र्याला होणार आहे. या पार्टीत बाॅलिवू स्टार्स असणार आहेत. अख्खं कपूर कुटुंब तर असेलच. सगळ्यांना आमंत्रणही पोहोचलंय. या सेलेब्समध्ये स्वरा भास्कर, करिश्मा कपूर, अमृता अरोड़ा, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, जॅकलीन फर्नांडिस, मसाबा गुप्ता, रानी मुखर्जी, जान्हवी कपूर, खुशी कपूर, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक जण असणार आहेत.

लंडनमध्ये झालं पहिलं डोहाळे जेवण
लंडनमध्ये एकदा हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी नॅपकिन्स आणि पाहुण्यांसाठीच्या भेटी सगळंच कस्टमाइज केलं होतं. पार्टीत सोनमची बहीण रिया कपूरही आली होती. सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते.
भूषण प्रधानच्या बारश्याचा हा किस्सा ऐकून तुम्हालाही येईल हसू
सोनम कपूरचं येणारे सिनेमे
या वर्षी सोनमचा ब्लाइंड सिनेमा रिलीज होणार आहे. Shome Makhija नं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विनय पाठक आणि Lillete Dubey यांची महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या वर्षी सिनेमाचं शूटिंग झालंय. या वर्षी तो रिलीज होईल.
आलिया भट्ट मुंबईत परतली, एअरपोर्टवर रणबीरला पाहाताच मारली मिठी