Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 15, 2022, 10:29 AM
राज्यात गुरुवारसाठी दिलेल्या अॅलर्टनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला. मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली. पुण्यातही पावासाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम आहे.

हायलाइट्स:
- जुन्नर तालुक्यातील झाले भूस्खलन
- तळेरान येथील ३० एकर शेती गाडली
- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
संततधार सुरू असल्याने या भागातील शेतकरी भाताची लावणी करतात. मात्र अचानक भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३० एकरहुन अधिक भात शेती या भूस्खलनाखाली गाडली गेली आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
वाचाः विंग कमांडर मराठे कुटुंबासह पाण्यात अडकले, हॅरिस पुलाखालून सुटका करण्यात यश
आमच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तरी आम्हाला प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी संकटात आले आहेत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून तळेरान येथील भूस्खलनामुळे भातशेती गाडली जाऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबत त्वरीत आदेश खा. अमोल कोल्हे यांनी दिले आहेत.

वाचाः आजपासून चार दिवस येणार समुद्राला उधाण; मुंबईतील किनारपट्टीवर जाण्याआधी भरतीच्या वेळा व तारीख जाणून घ्या
दरम्यान, राज्यातही अनेक प्रमुख केंद्रांवर गुरुवारी दिवसभरात फारसा पाऊस झाला नाही. महाबळेश्वर येथे ५४, तर नागपूर येथे ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू येथे ५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. घाट परिसरात दुपारपर्यंत ५० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तीन दिवसांमधील पावसामुळे राज्यातील काही नद्या इशारा पातळीच्या वर, तर काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत होत्या. गडचिरोलीमध्ये गोदावरी आणि इंद्रावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मात्र भारतीय हवामान विभागाच्या गडचिरोली केंद्रावर गुरुवारी दिवसभरात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वाचाः मरीन ड्राइव्ह झाले जलमय;कोस्टल रोड, अन्य कामांमुळे रस्ते पाण्याखाली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network