Ajit Pawar Convoy Stopped by Farmers : अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

 

Ajit Pawar
अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

हायलाइट्स:

  • अजित पवारांचा ताफा अडवला
  • अजित पवार अकोले तालुक्यात
  • साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी
अहमदनगर : विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा ताफा शेतकरी कार्यकर्त्यांनी अडवला. पवार आज अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचार सभेसाठी आले आहेत. अजित पवार यांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. याप्रकरणी पोलिसानी शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतले. अजित पवारांनी गायकर यांचा प्रचार करु नये म्हणून घोषणाबाजी करणारे शेतकरी मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अजित पवार यांचा ताफा कार्यकर्त्यांनी अडवला, यामुळं पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्यानं निषेध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले आहे.

ती बातमी खोटी; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर
मी अजित पवार यांना सभेच्या व्यासपीठावर शांततेच्या मार्गाने जाऊन भेटणार आहे, असं सावंत म्हणाले होते. जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी मी त्यांना भेटलो होतो तेव्हा अजित पवार यांनी मला मााघार घ्यावी म्हणून विनंती केली होती. ती विनंती मान्य करताना मी पवार यांना गायकरांना तुम्ही आता पवित्र करुन घेताय, असं दशरथ सावंत म्हणाले. अगस्ती कारखाना निवडणुकीवेळी तुमच्या पॅनलचे गायकर नेतृत्व तर नाहीच पण ते उमेदवार सुध्दा असता कामा नये अशी अट सावंत यांनी अजित पवार घातली होती.
शरद पवार गुरुसमान, ते दुखावले असल्यास घरी जाऊन माफी मागणार, दीपक केसरकरांचा नरमाईचा सूर
नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकाही चांगल्याच गाजतात. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थात मागील विधानसभा निवडणुकीत पिचड यांनी साथ सोडल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनीही या कारखान्याच्या निवडणुकीत आधीपासूनच लक्ष घातले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत, त्या सीताराम गायकर यांच्यावर पवार यांनी एकेकाळी कठोर टीका केली होती.
ललित- सुष्मिताचं ९ वर्ष जुनं Tweet Viral, तुम्ही पाहिलं का?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp leader lop ajit pawar convoy stopped by farmers in akole taluka of ahmednagar by farmers
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here