मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी यानं त्याच्या ट्विटरवरून सुष्मिताबरोबरचे त्याचे रोमँटिक फोटो शेअर करत ते रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मनोरंजन विश्वामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ललित मोदीच्या या ट्विटनंतर त्या दोघांच्या अफेअरवर चर्चा सुरू झाली, मीम्सही व्हायरल झाले आहेत.

लोकांचा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाही. या दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात तरी कधी झाली, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमध्ये सुष्मिता आणि ललित यांचे नऊ वर्षे जुने काही ट्विट व्हायरल झाले आहेत. ते ट्विट पाहून नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला की, दोघांच्या अफेअरला २०१३ मध्ये सुरुवात झाली आहे.

अधुऱ्या अनेक कहाण्या! इथे पाहा सुष्मिताच्या डझनभर अफेअर्सची यादी

ललित मोदी २०१३ मध्ये सुष्मिताला टॅग करत एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये कमिटमेंट आणि वचनाचा उल्लेख आहे. ललिनं सुष्मिताला टॅग करत लिहिलं होतं की, ‘माझ्या एसएमएसला उत्तर दे’ आता हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. नेटकरी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.


नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेन्ट

एका चाहत्यानं लिहिलं की, ‘कधीही आशा सोडू नका’, तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, ‘याची सुरुवात इथूनच झाली होती…’, आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘हार कधीही मानू नका…’ तर आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘चमत्कार प्रत्यक्षात कधीही होऊ शकतात!’

ट्वीट

सुष्मितानंही शेअर केली होती पोस्ट

ललित मोदीनं सोशल मीडियावर त्याची गर्लफ्रेंड सुष्मिताबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं आहे की, तो वर्ल्ड टूरनंतर लंडनला परत आला आहे. तो त्याच्या कुटुंबाबरोबर मालदीव आणि सर्दीनियाला गेला होता. त्यानं या पोस्टमध्ये सुष्मिताचा उल्लेख बेटरहाफ असा केला आहे. तसंच नवीन आयुष्याला सुरुवात करत असल्याचाही उल्लेख केला आहे. ललिनं याच पोस्टमध्ये त्या दोघांनी लग्न केलं नसल्याचं सांगत ते एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं आहे. लवकरच हे दोघं लग्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


काही महिन्यांपूर्वी झालं होतं ब्रेकअप

सुष्मिताच्या आयुष्यात अनेक बॉयफ्रेंड होतं. परंतु काही दिवसांपूर्वी रोहमन शॉलबरोबरही तिनं ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. ब्रेकअप झाल्यानंतरही रोहमन आणि सुष्मिता अनेकदा एकत्र दिसले होते. त्यावरून ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचंही समोर आलं होतं. दरम्यान, ललित मोदीचं मीनल हिच्याशी १९९१ मध्ये लग्न झालं होतं. परंतु मीनलचं २०१८ मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं.

अखेर सुष्मिता- ललित मोदीच्या अफेअरवर आली भावाची प्रतिक्रिया

रेबनो सिनेमाचा हा BTS व्हिडिओ पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here