प्रकाश राज यांनी सध्या सुरू असलेल्या वादात उडी घेतली असून एक फोटो शेअर करत त्यांनी आपण कुठं चाललो आहोत? असा प्रश्न विचारला आहे. परंतु यावरुनही त्यांना ट्रोल केलं जात आहे. प्रकाश राज यांनी जुने आणि आत्ताचे फोटो हे दाखण्याचा प्रयत्न केलाय. भगवान श्री रामाचा जुना फोटो आणि आत्ताचा, हनुमानाचा जुना आणि आत्ताचा असे फोटो त्यांनी शेअर केलेत.
हे फोटो शेअर करताना त्यांनी ‘आपण कुठं चाललोय ? सहज विचारचोय’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या प्रश्नाला उत्तर देताना अनेकांनी त्यांनी ट्रोल केलं आहे. कोणत्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडू नका, असं एकानं म्हटलंय. तर या फोटोंमागील माहिती काढून मग ट्वीट करा, असा सल्लाही एकानं दिलाय.
अनुपम खेर यांचं ट्वीट देखील चर्चेत
अनुपम खेर यांनी देखील टीकाकारांना उत्तर देणारं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अशोक स्तंभाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘अरे भावांनो, सिंहाला जर दात असतील तर ते दिसणारच ना, हा स्वतंत्र भारताचा सिंह आहे. गरज वाटली तर चावू ही शकतो. जय हिंद.’ अनुपम यांच्या या ट्विटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, संसदेच्या नवीन इमारतीवर स्थापित करण्यात आलेल्या सिंहप्रतिमांच्या भावमुद्रेवरून वाद निर्माण झाला असतानाच ही भव्य कांस्यप्रतिमा सारनाथ येथील अशोक स्तंभावरील शिल्पकृतीची हुबेहूब प्रतिकृती आहे, असा निर्वाळा हे शिल्प घडवणारे शिल्पकार सुनील देवरे यांनी दिला आहे.