जळगाव: ‘हॅलो गाइज, आज मैं आत्महत्या करनेवाला हूं, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करत एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना उघडकीस आली. धीरज शिवाजी काळे (वय २२, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

वरच्या मजल्यावरील खोलीत धीरजने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे दृश्य दिसून येताच वडिलांना धक्का बसला. काही एक कारण नसताना, सकाळपासून सामान्यपणे वागणाऱ्या धीरजने अचानकपणे आत्महत्या का केली? हा प्रश्न वडिलांना पडला. यानंतर नागरिकांनी धीरजचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.
नको आमदार, नको मंत्री; इथल्या लोकांची ‘ही’ एकच मागणी; अनोख्या पोस्टरची जोरदार चर्चा
दरम्यान, धीरजने आत्महत्येपूर्वी नऊ सेकंदाचा एक व्हिडिओ काही मित्र, समाज माध्यमात व्हायरल केला होता. त्यात त्याने मी आत्महत्या करत आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा असे आवाहन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
VIDEO: हाण की बडीव! एका बॉयफ्रेंडवरून दोघी भिडल्या; लाथाबुक्क्यांनी हाणलं, काठीनं चोपलं
धीरजने आत्महत्या का केली? याचे उत्तर त्याचे कुटुंबीयही देऊ शकले नाही. समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या धीरजने गुरुवारी सकाळी नऊ वाजता इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली. ‘एक मॉडेल से मुझे मोहब्बत हुई, मैने शादी के सपने देखे लेकीन वह हो गई किसी और की, नाराज मैने अपने देख लिए, हमने सीखा एकसे मोहब्बत करना, हर किसी को प्यार परोसा नही करते, जिंदगीमे एक बात याद रखना दोस्त, लडकी पर कभी भरोसा नही करते’, अशा आशयाचा डायलॉग धीरजने स्टोरीमध्ये म्हटला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here