लंडन: भारतीय क्रिकेट संघातील महाग खेळाडू आणि जागतिक क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. भविष्यात सचिन सारखी कामगिरी एखाद्याच खेळाडूला करता येईल. क्रिकेटमध्ये सचिनने खुप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली. सचिनकडे आलिशान स्पोर्ट्स कारपासून ते आलिशान घर आहे.

सचिनच्या सर्वच चाहत्यांना माहिती आहे की त्याचे मुंबईत प्रशस्त घर आहे. पण अनेकांना हे माहिती नाही की सचिनचे लंडनमध्ये देखील एक घर आहे. सचिनचे लंडनमधील घर हे क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स (Lord’s Cricket Ground) मैदानाच्या अगदी बाजूला असलेल्या अपार्टमेंटमध्ये आहे.

वाचा- ड्रग्स, धोकादायक शस्त्रांनी हल्ला, तुरुंगवास आणि बरच काही; ललित मोदीबद्दल या गोष्टी तुम्ही कधीच वाचल्या नसतील

सचिन आणि त्याचे कुटुंबीय नेहमी सुट्ट्यांसाठी लंडनला जाता तेव्हा याच घरात थांबतात. या घराचा एक किस्सा देखील आहे. सचिनने जेव्हा पहिल्यांदा लॉर्ड्स मैदान पाहिले होते तेव्हा त्याला ते इतके आवडले होती की, तेव्हाच सचिनने या मैदानाच्या जवळपास घर खरेदी करण्याचे ठरवले, असे म्हटले जाते.

Sachin Tendulkar House

वाचा- आईच्या मैत्रिणीशी विवाह; ९ वर्षांनी मोठ्या मीनलसोबतची लव्हस्टोरी वाचून सुष्मितालाही

मास्टर ब्लास्टर सचिन जेव्हा जेव्हा या घरात येते तेव्हा तो शेजारी असलेल्या मैदानात सरावासाठी न विसरता जातो. सचिनच्या या घराजवळ त्याचे स्वत:ची अकादमी देखील आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच घरात राहतो. सचिन प्रत्येक वर्षी विब्लंडन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला येत असतो.

वाचा- विराट कोहलीला संघात ठेवायचे की नाही? गांगुलीने एका वाक्यात विषय संपवला

लंडनच्या ज्या परिसरात सचिनचे घर आहे त्याच ठिकाणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष दिवंगत राजसिंग डुंगरपूर याचे देखील घर आहे. सचिनच्या घरी भारतरत्न लता मंगेशकर देखील अनेक वेळा आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here