Jalgaon Crime News : जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे वारंवार होणा-या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने चक्क विजेचा शॉक घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी पहूर पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायलाइट्स:
- सासरच्या छळाला कंटाळू विवाहितेची आत्महत्या
- विजेचा शॉक लावून केली आत्महत्या
- जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, सपना शाम एखरनार हिला सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती शाम रामदास एखनार हा दारुच्या नशेत मारहाण करायचा. याचप्रमाणे सासरे रामदास चिंतामण एखनार आणि सासू गीताबाई रामदास एखनार यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सपनाने ६ जुलै २०२२ रोजी सकाळी ५ वाजेपुर्वी स्वत: इलेक्ट्रीक शॉक लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी तिचे नातेवाईक अतुल बाजीराव भिसे (वय २५,रा. खंडवा,ता. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सपनाचे पती शाम रामदास एखनार, सासरे रामदास चिंतामण एखनार आणि सासु गीताबाई रामदास एखनार यांच्याविरुद्ध सपना हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत. याप्रकरणी मयत सपनाचे पती शाम रामदास एखनार व सासरे रामदास एखनार या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : jalgaon crime news tired of torture by father in law woman commits suicide by electric shock
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network